Tuesday, August 18, 2009

तंत्र शिक्षणाचे तंत्र आणि मंत्र गवसलेले महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. राजेशजी टोपे

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
तंत्र शिक्षणाचे तंत्र आणि मंत्र गवसलेले महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. राजेशजी टोपे
सरकार कोणत्याही देशाचे असो किंवा प्रदेशाचे असो त्यामध्ये असणारी जनता किती सुशिक्षित आहे याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. एखाद्या देशातली जनता निरीक्षर असेल तर देशाची प्रगती होणे कठीण काम असते, आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या अंमलाखाली होता तेव्हा त्यांनी राज्यकर्ते म्हणून एक प्रमुख गोष्ट कोणती केली असेल, तर देशातली सर्व शिक्षण प्रणालीच बदलून टाकली. इंग्रजांना जर या देशात राज्य करावयाचे असेल व ते राज्य कायम टिकवायचे असेल तर देशातलाच तरुण सुशिक्षित करावा आणि त्याच्याकडून सारी कामे करवून घ्यावीत, असा विचार त्या वेळेच्या राज्यकर्त्यांनी केला होता. त्यातूनच "बाबू' जमात निर्माण झाली. केवळ सरकारी अधिकारी आणि कारकून यांची संख्या कशी निर्माण करता येईल हाच विचार इंग्रज राज्यकर्त्यांनी केला. इंग्रजांनी केलेले कायदे कानून जरी भारतीय जनतेसाठी होते तरी त्याचा लाभ मात्र भारतीयांना फार कमी प्रमाणात मिळाला. इंग्रजांनी जे शिक्षणाचे धोरण ठरवले होते त्यामध्ये इंग्रजी भाषेला आपोआपच महत्त्व दिले गेले. वसाहतवादी वृत्तीमुळे इंग्रजांनी अगोदरच जगभर वसाहती स्थापन केल्या होत्या. त्यामुळे इंग्रजी ही जगाची भाषा व्हावी ही त्यांची इच्छा होती. काही प्रमाणात त्यांची ही इच्छा सफल झालेली दिसते. कारण आज जगाची भाषा कोणती असा प्रश्न कोणीही विचारला तर त्याचे उत्तर कोणीही इंग्लिश, किंवा इंग्रजी असेच देईल !
निरीक्षर जनतेकडून विकासाच्या अपेक्षा ठेवण्यात मोठा धोका आहे असे ब्रिटीश शिक्षण मंडळातल्या तज्ञ व्यक्तींनी मांडल्यामुळे कोणताही धोका पत्करु नये या दृष्टीने भारतात शिक्षण विषयक धोरण निर्माण केले गेले.
केवळ इंग्रजी मधून शिक्षण दिल्याने हा देश बदलेल अशी जी समजूत होती त्यास मात्र तडा गेलेला दिसतो. महात्मा गांधीनी देश "स्वतंत्र' होण्यासाठी जी चळवळ अथवा लढा उभा केला त्याचा परिणाम असा झाला की शिक्षित समाजाला हे कळून चुकले की इंग्लिश राज्यकर्ते आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे शैक्षणिक धोरण राबवीत आहेत. या शिक्षणामुळे कारकून वर्ग, प्राध्यापक वर्ग फक्त निर्माण झाला आणि अपेक्षित फायदे मिळणे दूरापास्त झाले. हा विचार मांडण्याचे कारण किंवा या सर्व पार्श्र्वभूमीचे निरीक्षण केल्यावर पुढे लक्षात येईल की एखाद्या देशाचे किंवा प्रदेशाचे साक्षरीकरण किंवा शिक्षण पध्दती किती महत्त्वाची असते, किती महत्त्वाची ठरु शकते.
आपला देश "स्वतंत्र' झाल्यावर शिक्षण विषयात देखील आमुलाग्र बदल झाले. खरं तर शिक्षण सहज, स्वाभाविकरित्या हसत खेळत व्हावयास हवे-होऊ शकते. पण शिक्षणामुळे परवड होते, दमछाक होते, नैराश्य येते अशा शोषणमुक्त आणि समताधिष्ठीत समाज रचना निर्माण व्हावी याचा एक विधायक मार्ग म्हणून जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची संकल्पना मांडली होती. समाज जीवनामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणे शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शैक्षणिक परिवर्तनाची दिशा, स्वरुप आणि उद्दीष्ट ठरविले. यामध्ये औपचारिक शिक्षण पध्दती, वैयक्तिक विकास आणि सामाजिक परिवर्तन या दृष्टीने ती अयशस्वी ठरली असे म्हणावे लागेल. या शिक्षण पध्दतीचा लाभ घेताना वरिष्ठ आणि मध्यमवर्गीयांना ती एक तर चुकीचे शिक्षण देते असे आढळून आले. या संदर्भात शिक्षणाचे नियोजन करायचे असल्याने सध्याची विषमता धिष्ठीत सामाजिक आणि वेतन विषयक संरचना बदलली पाहिजे आणि परस्पर पुरक सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांचा कार्यक्रम एकाच वेळी कार्यवाहीत आणला पाहिजे.
सध्याच्या शैक्षणिक पध्दतीत बदल करून अध्यापना ऐवजी अध्ययनावर भर देण्याची पध्दत अंमलात आणणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांनी परस्परांच्या सहकार्याने मूलभूत शैक्षणिक सुधारणांसाठी शिक्षण पध्दतीत आणि शिक्षण पध्दती बाहेर एकाच वेळी संघटित होणे गरजेचे आहे. शिक्षण पध्दतीचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला तर महाराष्ट्राची पुढची पिढी सगळयांना धन्यवाद देईल. शिक्षण पध्दती हेतूपूर्ण आणि परिणामकारक होण्यासाठी काही कठोर राजकीय आणि शैक्षणिक निर्णय घेतले पाहिजेत. तळपातळीतील लोकांपर्यंत कार्य करण्यासाठी प्राधान्य दिले गेले पाहिजे. पार्श्र्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांचे काम काय अथवा कार्य कोणते असा प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात डोकावणे शक्य आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणून ना.राजेश रोपेंनी केलेले कार्य महत्त्वाचे ठरावे. ना.शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ना.राजेशजीनी आपले सामाजिक कार्य सुरू केले. राजेशजींच्या विचारात, व्यवहारात आणि चारित्र्यात अशा काही आदर्श गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांचा आदर्श हा राजकारणातल्या प्रत्येक तरुणासाठी "दिपस्तंभ' ठरु शकतो. राजेशजी हे स्वयंभू, स्वावलंबी, स्वयंमत आणि स्वाभिमानी नेते आहेत. त्यांना वडिलोपार्जित किंवा घराण्याचा वारसा म्हणून आमदारकी मिळालेली नाही, नामदारकी मिळालेली नाही तर त्यांनी ती स्वतःच्या कर्तृत्वावर स्वकष्टाने मिळविली आहे. राजेशजींच्या प्रत्येक कृती मागे सामान्य माणसाचा विचार असतो. समाजाला हितकारक असे निर्णय घेण्याची प्रेरणा राजेशजींमध्ये दिसते. ग्रामीण जीवनाशी ते पूर्णपणे एकरुप झालेले असल्याने ग्रामविकासाच्या ध्येयाने झपाटलेले ध्येयवाढी नेते ही त्यांची आज ओळख आहे. शिक्षणातून ग्रामीण पूनर्रचना आणि ग्रामीण पुनर्रचनेतून शिक्षण हा महात्मा गांधींचा मूळमंत्र राजेशजींनी अंमलात आणून दाखविला आहे.
राज्याचे शासन करताना समाजातील प्रत्येक घटनेचा, समस्येचा अभ्यास करावा लागतो. तासनतास माहिती घ्यावी लागते. संदर्भ शोधावे लागतात. आकडेवारी घ्यावी लागते आणि स्वतःच्या नोटस काढाव्या लागतात. हे सारे कष्ट राजेशजींनी कधीही त्रागा न करता, न कंटाळता केले कारण त्या मागे समाज सेवेची नितांत कळकळ होती. केवळ सभा जिंकण्यासाठी किंवा प्रसिध्दी मिळविण्यासाठी ही हाव नव्हती. तर जनहिताची, अन्यायाला वाचा फोडण्याची, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची, लोकशाहीची बूज राखण्याची आणि महाराष्ट्र राज्याला उन्नत करण्याची तळमळ होती. राजेशजींची ही भावना प्रामाणिक व निःस्वार्थी आहे, असेच म्हणावे लागेल.
ना.राजेशजींचे विचार केवळ पुस्तकी नाहीत किंवा त्यांच्या मनातल्या कल्पना केवळ कागदी न राहाता त्यांनी त्या कृतीत आणल्या आहेत. विधिमंडळात काम करत असताना सुध्दा समस्यांना वाचा फोडण्याचे त्यांचे काम सुरूच होते. विधिमंडळाचे नियम व कार्य पध्दती यांचा गाढा अभ्यास केलेला असल्याने व सामान्य माणसांच्या समस्यांची जाण असल्याने त्यांचे विचार वेळोवेळी पुरोगामी व प्रगमनशील ठरलेले आहेत. त्यांच्या जवळ अभ्यास वृत्ती आहे. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. जनहिताच्या तळमळीने अहोरात्र काम करणारा लोकनेता प्रसंगी स्वतःच्या कौटुंबिक जीवनाची पर्वा करीत नाही.
ना.शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी नेहमी मदत करणारा नेता अशी त्यांची ओळख करून दिल्यास वावगे वाटणार नाही. आपल्या स्वकर्तृत्वावर त्यांनी उच्च शिक्षण, मंत्र्याचे पद मिळविले. नुसते पद मिळवून ते थांबले नाहीत तर शिक्षण पध्दतीचा सखोल विचार करून शिक्षण सुधारणांसाठी काही ठोस निर्णय घेतले. कोणतेही काम करताना प्रसिध्दीची हाव त्यांनी कधीही धरली नव्हती. फक्त दिलेले कार्य करीत राहाणे ही त्यांच्या कामाची पध्दत आहे.महाराष्ट्रात जे आघाडीचे नेते आहेत त्यामध्ये ना. शरद पवारांचे नाव वगळले तर ते उचित होणार नाही. कारण ना.शरद पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे. महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यातून समाजातल्या तळागाळातल्या प्रश्नांची जाण असणारा हा "लोकनेता' व त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेणारे ना. राजेशजींचे नेतृत्व आणि कर्तृत्व हे महाराष्ट्राला नेहमीच प्रेरणा देणारे ठरणारे आहे.
ना. राजेश टोपे यांचा आमचा परिचय जुना आहे. राजेश टोपे यांनी आमच्या जीवनात ज्येष्ठ मार्गदर्शक स्नेहयाची भूमिका कायम बजावलेली आहे. आम्ही आमचे वैयक्तिक काम घेऊन कधी त्यांच्याकडे गेलो नाही. आम्ही त्यांना विनंती केली ती नेहमीच समाजाच्या, गोरगरीबांच्या, तळागाळातील लोकांच्या सामूहिक सामायिक अशा व्यथा, कथा, समस्या अडचणींबाबत. आम्हाला हे नमूद केले पाहिजे की, राजेशजींनी दरवेळी आस्थापूर्वक आमचे म्हणणे ऐकून घेतले. विषयाचा तपशील जाणून घेतला. केवळ कायदा हा निकष न मानता "स्पिरीट ऑफ लॉ' लक्षात घेऊन निर्णय घेतला आणि न्याय दिला. महाराष्ट्रात शिक्षण खाते पूर्वी व्यापक होते. सर्व प्रकारचे शिक्षण शिक्षणखात्याच्या अखत्यारित येत असे. पुढे वसंतदादा पाटलांनी तंत्रशिक्षण महाविद्यालयांना महाराष्ट्रभर परवानगी दिली. बहुजन समाजापर्यंत उच्च तंत्रशिक्षण पोहचले पाहिजे हा हेतू त्यामागे होता. त्यानिमित्ताने प्रथमच उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग शिक्षण खात्यातून वेगळा काढण्यात आला. या उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्रीपद ना. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असताना तंत्रशिक्षण खात्याचा पाया घातला गेला. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस तसे ना. राजेश टोपे यांनी तंत्रशिक्षणाच्या धोरणाचा कळस उभारला आहे.
नुकतेच आम्ही ना. राजेश टोपे साहेबांकडे बसलो असताना ते इंडीयन एक्सप्रेसच्या वार्ताहरला मुलाखत देत होते. या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले की, महाराष्ट्र शासनाने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या बी.ए.एम.एस. या अभ्यासक्रमात सहा महिन्यांच्या ऍलोपॅथीच्या अभ्यासक्रमाचा समावेश करून आता एम.बी.बी.एस. प्रमाणे आयुर्वेदिक डॉक्टरांनाही ऍलोपॅथिची प्रॅक्टीस करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पहातच राहिलो. गेल्या 25 वर्षे आयुर्वेदात बी.ए.एम.एस. करणारे डॉ. ऍलोपथीची प्रॅक्टीस करायला अधिकृतपणे परवानगी मिळावी म्हणून संघर्ष करीत आहेत. तसे पाहिले तर आयुर्वेदिक डॉक्टर्स अधिकार नसताना ऍलोपॅथिक औषधे देतच होते. पण आता ना. राजेश टोपे यांनी अत्यंत महत्त्वाचा धाडसी निर्णय घेतला. आता महाराष्ट्र शासनाने आयुर्वेदिक बी.ए.एम.एस डॉक्टरांची 25 वर्षे चाललेली मागणी पुरी केली आणि लोकानाही रिलीफ दिला. याबद्दल ना. राजेश टोपे यांचे अभिनंदन करायला हवे.
नामदार राजेश टोपे हे मा. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारकिर्दीत यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहेत. आणखी दहा वर्षांनी त्यांचे नाव संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या यादीत झळकलेले असणार याबद्दल आमची खात्री आहे आणि आमच्या शुभेच्छाही त्यांच्या सोबत आहेत.

No comments:

Post a Comment