Tuesday, August 18, 2009

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहे.
महाराष्ट्राचे महानेते विलासरावजी देशमुख
महाराष्ट्राच्या मागच्या पिढीला अजूनही याद असेल की 105 हुतात्म्यांच्या बलिदाना नंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्या पूर्वी गुजराथ व महाराष्ट्र असा एकच प्रांत अस्थित्वात होता. भाषांवार प्रांत रचना करण्याचे सरकारचे धोरण असल्याने ज्या विभागात एखादी प्रचलित भाषा अस्तित्वात आहे किंवा बोलली जाते त्या दृष्टीने वेगवेगळी राज्ये स्थापन करून "प्रजासत्ताक' एकसंघ देश निर्माण व्हावा ही त्या मागची कल्पना होती.
मे हा जसा कामगार दिन म्हणून जगात साजरा केला जातो. त्याच बरोबर महाराष्ट्राची जनता एक मे रोजी आपले मराठी भाषेचे, मराठी जनांचे वेगळे राज्य अस्तित्वात आले म्हणून आनंदोत्सव साजरा करीत असते. 1960 मध्ये भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या वेळेचे त्यांचे सहकारी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा "मंगलकलश' ठेवला व सांगितले की "यशवंतरावजी',तुमच्या महाराष्ट्राने या देशाला जे महान नेते उदा. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ना. गोखले, महात्मा ज्योतीराव फुले या सारखे नेते दिले व त्या बद्दल सारा देश महाराष्ट्राचा ऋणी तर राहीलच, पण ज्या देशात इतकी प्रतिभावान, चारित्र्यसंपन्न, निष्ठावान व त्याग करणारी माणसे जन्माला येतात त्यांचे स्वत:चे असे स्थान जपणे, ओळख जपणे यासाठी आज महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याची गरज आम्हाला वाटते!
पंडित जवाहरलालजींना महाराष्ट्राबाबत नक्कीच प्रेम होते आणि पुढे त्यांची कन्या स्व.इंदिरा गांधी पुण्यात पर्यायाने महाराष्ट्रात शिकण्यान राहिली होती हे किती जणांच्या स्मरणात असेल? स्व.यशवंतराव चव्हाण हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते होते. चारित्र्य संपन्न, बुध्दिमान, तेजस्वी विचार बाळगणारे, निर्भीड, स्पष्ट वक्ते, दूरदृष्टी असलेले नेते होते. महाराष्ट्राला केवळ विकसित करून चालणार नाही तर "महाराष्ट्र' देशाचे नेतृत्व करू शकेल अशा प्रकारचा महाराष्ट्र्र त्यांच्या नजरे समोर होता.
ही पार्श्वभूमी विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे ज्या राष्ट्राचा इतिहास वैभवशाली , प्रगतीचा असतो. त्या राष्ट्रावर, प्रदेशावर मोठी जबाबदारी असते. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र मग रामदासांच्या उक्ती प्रमाणे "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' पुढे प्रगती पथावर सदैव राहीला! सन1960 महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर महाराष्ट्राचे पहिले "मुख्यमंत्री' म्हणून जनतेचे स्व. यशवंतराव चव्हाण यांचीच निवड केली. यशवंतरावांच्या तोडीचा नेता महाराष्ट्रात नव्हता असे नव्हते, तर यशवंतरावांची जी दूरदृष्टी होती की भारत हा शेतीप्रधान देश आहे.शेतकऱ्यांचा देश आहे. शेतकऱ्यांनी धान्य पिकविले तर देशाची प्रगती नक्कीच होईल. त्या दृष्टीने महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला शेतकरी तो कष्टकरी आहे. त्याला सुखी करावयाचे असेल तर त्याच्या साठी वेगळे राज्य असणे गरजेचे आहे आणि त्या काळात एक नजर टाकली तर असे चित्र दिसून येते, की शेती बरोबर औद्योगिक प्रगती महाराष्ट्रात सुरू झाली . त्यामध्ये मग किर्लोस्कर, बजाज, लालचंद हिराचंद, वालचंद हिराचंद फिरोदिया या सारखी घराणी होती त्यांनी महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी निवडली. औद्योगिक उत्पादनाने जसा वेग घेण्यास सुरुवात केली तसा जनतेकडे पैसा येण्यास सुरुवात झाली व प्रगतीच्या दृष्टीने महाराष्ट्राची सुरुवात झाली असे म्हणता येईल.
हा सारा इतिहास समजून घेतल्या शिवाय किंवा ज्यांना हा सारा इतिहास अवगत आहे त्यांना पुनर्परिक्षणाद्वारे हे निदर्शनास येईल की महाराष्ट्राची ही पार्श्र्वभूमी एका जाज्वलय, दैदिप्यमान, जागृत अशा गुणांवर उभी राहिलेली आहे. स्वकतर्र्ृत्वाचा अभिमान, देशप्रेमाची प्रेरणा, संकटाशी लढण्याची जिद्द हे गुण महाराष्ट्रातल्या पुढच्या नेत्यांमध्ये तसेच जनतेतही उतरले तर नवल कोणते हे सारे विस्ताराने सांगण्याचे लिहिण्याचे कारण असे की, महाराष्ट्राचा हा वैचारिक वारसा पुढच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी सदैव पुढे नेला.
महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील, स्व.वसंतदादा नाईक, शंकरराव चव्हाण, बॅ.ए.आर. अंतुले., बॅ.बाबासाहेब भोसले या सारखे दिग्गज नेते व विचारवंत मुख्यमंत्री लाभले. महाराष्ट्र निर्मिती नंतर ही मुख्यमंत्र्यांची निष्ठावंत पिढी होती.
त्यानंतरच्या नेतृत्वात मग मनोहर जोशी,विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, आणि आजचे धडाडीचे व उमदे नेतृत्व ना.अशोक चव्हाण ही पूढची पिढी असे म्हणता येईल. या सर्वांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी शपथ घेतली.
विलासराव देशमुखांची कारकिर्द तपासल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने व समस्या उभ्या होत्या.
1974 ते 1979 या कालावधीत ते लातूर जिल्ह्यातल्या बाभूळगाव पंचायतीचे सभासद म्हणून निवडून येवून त्यांनी त्यांचे राजकीय जीवन प्रवासाचे कार्य सुरू केले. 1974 ते 1976 पर्यंत ते बाभूळगावचे सरपंच होते. नंतर उस्मानाबाद डिस्ट्रीट युथ कॉंग्रेसचे सदस्य, उस्मानाबाद जिल्हा युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष अशी तरुणपणात वेगवेगळी आव्हाने स्वीकारण्यास सुरुवात केली. समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या मुलाने झटावे , पुढे यावे , गोरगरिब जनतेची सेवा करावी असे त्यांच्या वडिलांना म्हणजे स्व. दगडोजी देशमुखांना वाटत असे. मुलाने शिक्षण तर घ्यावेच, पण त्याच्या शिक्षणाचा फायदा समाजाला मिळावा अशी त्यांची धारणा होती. आपल्या गावाचा, विभागाचा विकास त्याने केला पाहिजे ही त्यांची तळमळ होती. शिक्षणाचा फायदा तर घरच्यांना व्हावाच, विलासराव देशमुखांचा जन्म 25 मे 1945 रोजी बाभूळगाव या लातूर जिल्ह्यातल्या छोट्याशा खेडेगावात झाला. त्यांचे वडील दगडोजी देशमुख हे प्रगतीशील शेतकरी म्हणून साऱ्या आसपासच्या परिसरात ओळखीचे होते. भारतात काय किंवा महाराष्ट्रात काय जी प्रगत शेतकऱ्यांनी एक समृध्दी बहाल केली आहे. त्या बद्दल सारी जनता या शेतकऱ्यांची ऋणी राहील.
विलासरावांनी इ.डउ. सायन्स आणि इ.अ चे शिक्षण पुण्यातल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेतलेले आहे. त्या नंतर त्यांनी एल. एल. बी. चे पुढचे शिक्षण लॉ. कॉलेज पुण्यातून पूर्ण केले आहे. तरुण पणामध्ये त्यांनी सामाजिक उपक्रम सुरू केले. उस्मानाबाद डिस्ट्रीट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे ते संचालक बनले. 1979 मध्ये महाराष्ट्र स्टेट को. ऑप बॅंकेचे ते संचालक बनले. त्यांच्या सुविद्य पत्नी वैशालीताई देशमुख आणि तीन मुलांपैकी म्हणजे अमित व रितेश यामध्ये रितेश देशमुख चित्रपट सृष्टीतला उभरता कलाकार म्हणून सारा देश आज ओळखतो आहे. त्याच बरोबर त्यांचे तरुण भाउ दिलीपराव देशमुख मिनिस्टर ऑफ रिहॅबीलेशन स्पोर्टस युथ वेल्फेअर आणि प्रोजेक्टस या महाराष्ट्रातल्या मंत्री मंडळात त्यांनी मंत्री म्हणून कामाचा ठसा उमटवला आहे.
ना. विलासराव एकदा आपल्या मुलाखतीत म्हणाले होते की माझ्या तरुणपणी मी कॉलेजात असताना चित्रपट सृष्टीतला माझा आवडता हिरो होता तो. म्हणजे दिलीप कुमार! कॉलेजच्या जीवनात दिलीप कुमारजींचे चित्रपट बघण्याचे आम्हा मित्रांचे वेड होते. "नया दौर' हा त्यांचा चित्रपट आम्ही अनेक वेळा पाहिला आणि त्या चित्रपटामुळे माझे समाजाकडे बघण्याचे दृष्टीकोन साफ बदलले! समाजातील गरीबी, अत्याचार याकडे मी स्वत: काय करू शकतो असेे आत्म परिक्षण मी अनेक वेळा करू लागलो. दिलीप कुमारजी माझ आवडते हीरो होते व त्या वेळेस ही कल्पानाही नव्हती की मी त्यांच्या संपर्कात येईन. त्यांच्याशी बोलेन किंवा त्यांचे व माझे संबंध घनिष्ठ होतील. दिलीपकुमारजींवर कॉंग्रेसच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या वर नेहरूंचा प्रभाव होता. नेहरूंचे विचार त्यांना आवडत होते. पंडितजींच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते आणि देशाच्या उन्नतीसाठी काहीतरी करावयाची प्रबळ इच्छा मनात होती आणि त्या वेळेस असलेले चित्रपट माध्यम हे खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचण्याचे एक साधन बनले होते. चित्रपटांकडे सामाजिक उन्नतीचा, सामाजिक बदलाचा संदेश सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचवीला जात होता. आमच्या कॉलेज जीवनात नया दौर ,सुजाता, अनपढ या सारखे अनेक उत्तमोत्तम चित्रपट आम्ही बघितले. सामाजिक बदल चित्रपट माध्यमांद्वारे सुध्दा होवू शकतात हे माझे स्पष्ट मत आहे असे ही त्यांनी सांगितले. दिलीप कुमार बलराज सहानी, सुनील दत्त हे चित्रपट अभिनेते माझे आदर्श होते. त्यांचे सामाजिक विचार मला खूप आवडत असत तर देवानंद माझा आवडता कलाकार होता. त्या जमान्यात जगण्याची उर्मी काही औरच होती. आपण खूप शिकावे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जी गरीब जनता आहे तीला मी कसा बदलवू शकेन हा विचार माझ्या मनात सदैव येत असे! तरुणपणात समाज विधायक कामांची दृष्टी तयार झाली आणि मग पुढच्या राजकीय प्रवासाची दिशा निश्चित झाली. राजकीय क्षेत्रात काम करण्याचे पक्के झाले. राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट झाली. मार्ग सुकर झाला. वडील स्व. दगडोजी देशमुख हे कॉंग्रेसच्या विचार प्रणालीचे प्रवर्तक असल्याने त्यागभावना , देशनिष्ठा, समाज उन्नती हे आवश्यक गुण आपोआपच विकसित झाले. जिल्हास्तरीय नेतृत्व करताना मग ग्रामपंचायत, जिल्ह्याचे नेतृत्व, महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना आज ते कॉंग्रेसचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी एक जबाबदार नेता म्हणून सर्वांना परिचित आहेत. मराठवाडा परिसरात त्यांनी केलेेले काम मोठे आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांंनी अनेक योजना राबविल्या आहेत. 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दोन वेळा हे मानाचे पद भूषविले आहे. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री त्या राज्याचा पहिला नागरिक असतो. राज्याच्या विकासाची तळमळ,जनेतेचे प्रश्न, भविष्यात निर्माण होणारी आर्थिक, सामाजिक , औद्योगिक प्रगती या विषयी जाण असणे ही प्रथम गरज आहे व त्यामध्ये विलासराव पूर्णपणे यशस्वी ठरलेले आहेत. निगर्वी, संयमी, शांत स्वभावाचे विलासराव कोणत्याही गंभीर प्रसंगी किंवा अकल्पित घडणाऱ्या घटनेने अस्वस्थ न होता. शांतचित्ताने विचार करतात, मनन करतात व कठीणातले कठीण प्रश्न सहजगत्या सोडवतात.
1980 ते 1995 असे सलगपणे ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले परंतु ते गृह, पब्लिक वर्क्स, ट्रान्सपोर्ट, पर्यटन व व्यवसाय, ऍनिमल हजबंडरीज, डेअरी डेव्हलपमेंट, फिशरीज इंडस्ट्री, रुरल डेव्हलपमेंट, शिक्षणमंत्री, स्पोर्टस युथ वेल्फेअर अशा अनेक मंत्री पदाच्या कामाचा त्यांना दिर्घ अनुभव आहे. 1995 मध्ये त्यांनी निवडणुकीत 35 हजार मतांनी पराभव स्विकारला आणि पराभवा नंतर आपल्या चुकांचे आत्मपरिक्षण केले आणि सप्टेंबर 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत एक्याण्णव हजार मतांनी विजयी होवून विजय प्राप्त केला. सुशिल कुमार शिंदे त्यांचे जवळचे मित्र आहेत. जानेवारी 2003 मध्ये त्यांनी आपल्या मित्रासाठी सुशिलकुमारजींसाठी मुख्यमंत्री पद सोडले. आपल्या मित्रासाठी प्रसंगी मुख्यमंत्री पदाचा त्याग करणारे हे पहिलेच मुख्यमंत्री असावेत अशी जनतेची धारणा आहे म्हणूनच जनतेचे ही त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. कोणताही राजकीय नेता हा त्याने केलेल्या काम व त्यागाने श्रेष्ठ ठरत असतो.ही शिकवण त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या पासून घेतलेली आहे.
विलासरावांनी आपल्या कामानिमित्त जपान, थायलॅंड, तैवान, फ्रान्स, इंग्लंड, वेस्ट जर्मनी, अमेरिका असा जगभर प्रवास केलेला आहे. परदेशातले आलेले अनुभव इथल्या अनुभवांशी तपासून त्यांना पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने ना.विलासरावानी एक स्पष्ट दिशा दिलेली आहे.

No comments:

Post a Comment