Friday, October 23, 2009

खा.गोपीनाथ मुंडे, प्रवीण महाजनांच्याआरोपपत्रावर महाराष्ट्राला जवाब द्या!

खा.प्रमोद महाजनांची हत्या करणारे त्यांचे सख्खे भाऊ प्रवीण महाजन यांनी जुलै महिन्यात माझा अल्बम नावाचे एक स्फोटक खळबळजनक गौप्यस्फोट करणारे पुस्तक प्रकाशित केले. सहा महिन्यांपूर्वी दै.लोकसत्तामध्ये या पुस्तकातील एक प्रकरण प्रकाशित झाले होते. त्या "हेडलाईन'वर झळकलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व अशी खळबळ उडाली होती. संघ परिवार हादरून गेला होता. भारतीय जनता पक्षाचे नेते तोंड लपवून बसले होते. कार्यकर्ते हवालदिल झाले होते. आता तर संपूर्ण पुस्तकच प्रकाशित झाले आहे. असे म्हणतात की हे पुस्तक सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचू नये म्हणून "भाजपा'च्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांकडून एक व्यूहरचना करण्यात आली आहे. बहुसंख्य पुस्तक विक्रेत्यांनी हे पुस्तक आपल्या दुकानात ठेवायलाच नकार दिला आहे.यामागे अर्थातच संघ "परिवारा'चा दबाव आहे. ज्या काही पुस्तक विक्रेत्यांनी प्रवीण महाजनांचे हे पुस्तक ठेवण्याची "हिंमत' केली आहे तिथे "भाजपा' कार्यकर्त्यांना पाठवून "माझा अल्बम'च्या असतील तेवढ्या प्रती विकत घेऊन नष्ट केल्या जात आहेत. हे पुस्तक छापण्याची हिंमत महाराष्ट्रातील एकाही धंदेवाईक प्रकाशकाने न दाखवल्यामुळे प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.या पुस्तकात स्वर्गीय खा.प्रमोद महाजन आणि विद्यमान खा.गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रवीण महाजन यांनी फार गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यातील एक प्रकरण दै.लोकसत्तामध्ये प्रकाशित झाले तेव्हा खा.गोपीनाथ मुंडे, रेखा महाजन, पूनम महाजन यांनी 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा प्रवीण महाजन यांच्यावर ठोकण्याची घोषणा केली होती. पण अब्रुनुकसानीचा खटला महाजन-मुंडे कुटुंबावरच "बुमरॅंग' होईल अशा भितीने की काय कोण जाणे पण मुंडे-महाजन परिवाराने प्रत्यक्षात असा अब्रूनुकसानीचा खटला प्रवीण महाजनांवर भरल्याचे दिसले नाही. आताही "माझा अल्बम' हे पुस्तक प्रकाशित होऊन महिना लोटला तरी त्यावर अब्रुनुकसानीचा खटला मुंडे-महाजनांनी भरल्याची बातमी आमच्या वाचनात आलेली नाही.वास्तविक आगामी विधानसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील सूत्रे खा.गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आहेत म्हटल्यावर त्यांनी सर्वप्रथम मुंडे-महाजन परिवारावरील गंभीर आरोपांचे सार्वजनिक व्यासपीठावरून शंका निरसन करायला हवे होते. महाराष्ट्रात "भाजपा' म्हणजे पूर्वी "प्रमोद महाजन' अशी प्रतिमा होती. आज खा.गोपीनाथ मुंडे हाच महाराष्ट्र "भाजपा'चा चेहरा आहे. हा "चेहरा' जर डागाळलेला राहिला तर महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजपा आणि पर्यायाने शिवसेनेच्याही भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याकरीता शिवसेना नेत्यांनीही खा.गोपीनाथ मुंडे यांच्यावर दबाव निर्माण करून प्रवीण महाजन यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणे खा.मुंडे यांना भाग पाडले पाहिजे.खा.गोपीनाथ मुंडे आणि रेखा-पूनम महाजन परिवारासाठी तर "माझा अल्बम' पुस्तकातील प्रवीण महाजन यांच्या प्रत्येक विधानाचा त्यांच्या बाजूने जाहीर खुलासा करण्याची गरज आहे. अब्रुनुकसानीचा दावा प्रवीण-सारंगी या लेखक-प्रकाशक दांपत्यावर करायचा किंवा नाही हा मुंडे-महाजन परिवाराचा खाजगी प्रश्र्न असला, तरी प्रवीण महाजनांनी "माझा अल्बम' या पुस्तकात केलेल्या प्रत्येक आरोपयुक्त विधानाचा सार्वजनिक व्यासपीठावरून खुलासा करणे ही मुंडे-महाजन परिवाराची जबाबदारी आहे, यात शंका नाही. मुंडे-महाजन परिवार महाराष्ट्रातील पवार-चव्हाण-मोहिते-पाटील-पाटील अशा राजकीय घराण्यांपैकी एक आहे. आम्ही प्रवीण महाजनांच्या आरोपांची दखलच घेऊ-महत्त्व देऊ इच्छित नाही असे मुंडे-महाजन यांनी म्हणणे ही पळवाट आहे. महाराष्ट्रातील जनतेला खा.गोपीनाथ मुंडे यांच्याकडून प्रवीण महाजनांच्या प्रत्येक विधानाचा सविस्तर आणि संपूर्ण शंका निरसन करणारा खुलासा हवा आहे. रेखा आणि पूनम महाजनांनीदेखील मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत येऊन आपल्या विषयी प्रवीण महाजनांनी केलेल्या आरोपांचा इन्कार किंवा पुराव्यांनिशी खुलासाही करायला हवा. याला पर्याय नाही. महाराष्ट्राला मुंडे-महाजनांकडून प्रवीण महाजनांच्या ज्या विधानांसंदर्भात खुलासा हवा आहे ती आरोपवजा विधाने अशी : ("माझा अल्बम' या प्रवीण महाजन लिखित आणि सारंगी महाजन प्रकाशित पुस्तकातील "आरोपपत्र' म्हणता येईल अशा मुंडे-महाजन परिवार विषयक विधानांची सूची पुढे दिली आहे. सोबत ते विधान असलेला पृष्ठक्रमांक दिला आहे.)प्रवीण महाजन यांची मुंडे-महाजन परिवारावरील आरोपपत्र वजा विधाने : * पृष्ठ क्रमांक 5 : बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्याची हातोटी असलेला प्रमोद, कधी वाजपेयींच्या तर कधी अडवाणींच्या विश्र्वासातला म्हणून ओळखला जाणारा प्रमोद, पक्षाचा आधारस्तंभ होता हे खरेच. पण हे त्याचे बाह्यरूप होते. पत्रकारांना तेच रुप माहित होते. दिल्लीच्या आणि काही मुंबईच्या पत्रकारांना प्रमोदची पंतप्रधान व्हायची महत्त्वाकांक्षा ठाऊक होती. त्याचप्रमाणे प्रमोदच्या चारित्र्याविषयी संघ परिवारात असलेल्या गंभीर तक्रारीही पत्रकारांच्या कानावर होत्या. पैसे, मैत्रिणी, सत्तेची त्याला चढू लागलेली धुंदी पत्रकारांच्या कानावर येत असे ती भाजपाच्याच अनेक नेत्यांकडून वा या भानगडींना सांभाळून घेणाऱ्या कार्यकर्त्यांकडून. प्रमोदची पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षकचेरीतील कर्मचाऱ्यांमध्ये एक दहशत होती. कोणताही कार्यकर्ता किंवा कर्मचारी केव्हाही त्या पदावरून हटवला जाऊ शकतो आणि प्रमोद शब्दश: देशोधडीला लावू शकतो. अशी ताकद त्याच्याकडे होती हे त्यानेच हुशारीने पसरवले होते.पृष्ठ क्र.5 : अनेक पत्रकारांचे, अगदी वार्ताहरांपासून संपादकांपर्यंत आणि तरुण देखण्या स्मार्ट महिला पत्रकारांपासून उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांपर्यंत प्रमोदने स्वत:चे असे एकवर्तुळ निर्माण केले होते. त्या वर्तुळाचा दबाव भाजपाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांवर होता. त्या दबावामुळेच प्रमोदची अरेरावी, त्याच्या बेबंद बाहेरख्यालीपणा खपून जात असे. प्रमोद स्वत: वारंवार परदेश दौरे करीत असे. भाजपात प्रमोद परदेश दौऱ्यात काय करतो हे एक गूढच असे. या दौऱ्यांमध्ये त्याच्या बायकोऐवजी दुसरीच कुणी तरुणी गेल्याची कुजबुज पक्षात चाले. हळूहळू परदेशातच नव्हे तर इथल्याच पंचतारांकित हॉटेलात, 1201 पूर्णा या वरळीतील फ्लॅटमध्येही फॅशनेबल श्रीमंत मैत्रिणींचा वावर वाढल्याचे बोलले जाऊ लागले.पृष्ठ क्र.6 : प्रमोदचे मंत्रीपद जायला जी अनेक कारणे होती त्यात हा बाहेरख्यालीपणा हेही एक कारण होते.पृष्ठ क्र.7 : जोपर्यंत आपण पक्षाला निधी पुरवतो आणि शरद पवार, जयललिता, बाळासाहेब ठाकरे यांचा "भाजपा'शी संवाद घडवून आणतो तोवर आपल्या व्यक्तिगत चारित्र्याची कुणी चौकशीही करू नये असे प्रमोद जाहीरपणे सांगत असे.पृष्ठ क्र.8 : पुढेपुढे रेखावहिनींकडूनही वाजपेयी-अडवाणी-मुरली मनोहर जोशींपर्यंत प्रमोदच्या बदफैलीपणाच्या तक्रारी जाऊ लागल्या. जो वेगाने वर जातो, तो तितक्याच वेगाने खाली येतो तसे प्रमोदचे होऊ लागले.पृष्ठ क्र.16 : माझ्या आईवडिलांच्या वारंवार होणाऱ्या कडाक्याच्या भांडणांचे मूळ बहुधा प्रमोदच्या वागण्यातच असे.पृष्ठ क्र.17 : प्रमोदच्या टेन्शनमुळेच झालेल्या आईवडिलांच्या भांडणातून वडिलांचा मृत्यू झाला.पृष्ठ क्र. 23 : प्रमोदला तसा मनातून कोणाविषयीही आदर नव्हता. संघाबद्दलचे त्याचे विचार धक्का देणारे होते. तो मला म्हणाला होता,"जसे गणपती वर्षातून एकदा दहा दिवस येतात तसाच संघाचा वापर फक्त निवडणुकांपुरताच करायचा असतो.' प्रमोद हा "फिक्सर' "डबल डिलर' कारस्थानी, विधी निषेधशून्य आणि नव्या राजकारण्यांमधील सर्वात यशस्वी राजकारणी होता. अमर सिंगांप्रमाणे!पृष्ठ क्र.24 : 1996 च्या सुमारास गोपीनाथ मुंडे यांच्या बरखा प्रकरणाचा गाजावाजा मुंड्यांना शह देऊन काबूत ठेवण्याकरता प्रमोदनेच केला.पृष्ठ क्र. 24 : निवडणुका म्हणजे निधी संकलन. त्या पैशातूनच तो ह्याचे खाजगी शौक पुरवीत असे. त्याने पक्षाकडे कधीही सर्व सोर्सेसची माहिती दिली नाही आणि तशी ती कधी द्यायची नसते हे तो मला आवर्जून सांगत असे.पृष्ठ क्र.25 : रेखावहिनींना प्रमोदपासून घटस्फोट हवा होता.पृष्ठ क्र.25 : गोपीनाथ मुंडे यांची पत्नी बिन्नी हिच्या नावावरील वरळीच्या 1201 पूर्णा या फ्लॅटचा वापर प्रमोद भानगडींसाठी करीत असे.पृष्ठ क्र.25 : प्रमोदची मजल साक्षात आईवर हात उगारण्यापर्यंत गेली होती.पृष्ठ क्र.26 : ज्या श्र्वेता तिवारीच्या प्रमोदसोबतच्या स्वैराचारी वागण्याबद्दल त्याचा मुलगा राहुलने माझ्याकडे तक्रार केली होती, त्याच श्र्वेता तिवारीशी राहुलने पुढे लग्न केले. (आणि नंतर घटस्फोटही घेतला.)पृष्ठ क्र.27 : प्रेम आणि व्याभिचार यात प्रमोदने फरक केला नाही.पृष्ठ क्र.27 : सुखदा इमारतीत दोन फ्लॅट असतानाही प्रमोद पूर्णा इमारतीत स्वतंत्र फ्लॅटमध्ये भानगडी करण्याकरताच राहत होता.पृष्ठ क्र.27 : सर्वांनी एकत्र रहायला पाहिजे असा आग्रह स्वत:च्या लग्नानंतर धरणारा प्रमोद स्वत: मात्र कुटुंब "सुखदा'मध्ये रहात असताना "पूर्णा'मध्ये एकटा राहत होता.पृष्ठ क्र.28 : 2004 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले कर्ज फेडण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी राज्यसभेची भाजपाच्या कोट्यातील महाराष्ट्रातील एक जागा उद्योगपतीला विकण्याचा घाट घातला होता. प्रमोद महाजनांना मुंड्यांचे पक्ष अतिलाड करतो, असा राग होता.पृष्ठ क्र.29 : प्रमोदच्या भानगडींमुळे नाराज पक्षश्रेष्ठी मला छळतात असे संतापून गोपीनाथ मुंडे म्हणत.पृष्ठ क्र. 32 : निवडणुकांपेक्षा पक्षाची अधिवेशने भरवणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते असे प्रमोद म्हणे.पृष्ठ क्र. 33 : आणीबाणीत घरात लपून बसलेला प्रमोद महाजन घरातच कागद घेऊन हगायला बसत असे, आणि मी ती घाण साफ करायचो.पृष्ठ क्र.35 : 1995 मध्ये शिवसेनेला घाबरवून मुंड्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळवून दिले.पृष्ठ क्र.38 : प्रमोदला मध्यमवर्गीय संघवाले आवडत नसत. त्याला "सिलेब्रेटी' आवडत असत.पृष्ठ क्र.41 : प्रमोदचे अलकनंदा प्रकरण बाहेर आले तेव्हा मुंड्यांचेही असेच प्रकरण असल्याचे समर्थन प्रमोदने केले.पृष्ठ क्र.44 : प्रमोदला स्वत:लाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्याने नाईलाजाने मुंड्यांना उपमुख्यमंत्री केले.पृष्ठ क्र.45 : प्रमोदला त्याच्यावर अवलंबून नसलेल्या माणसांचा तिटकारा होता.पृष्ठ क्र.45 : लेटलतिफ मुंड्यांचा तो जाणूनबुजून अपमान करीत असे.पृष्ठ क्र.48 : प्रमोदचा पी.ए.विवेक याचा मृत्यू रहस्यमय होता पण ते गूढ उकलण्याचा प्रयत्न केला गेला नाही.

No comments:

Post a Comment