गोत्यात आणणाऱ्या नात्यांचे व्यवस्थापन दुरावलेल्या नातेवाईकांचे पुनरागमन
"रिलेशनशिप मॅनेजमेंट' म्हणजे "नातेसंबंधांचे व्यवस्थापन' अशा एका अगदी वेगळ्या विषयावरील कार्यशाळेला मी नुकताच गेलो होतो. तिथे मी जे काय ऐकले, शिकलो ते सारांशाने तुम्हाला सांगितले तर, एका जिव्हाळ्याच्या संवेदनशील विषयावर, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल, तुम्ही मला नक्की धन्यवाद द्याल. वाचा तर मग! प्रत्येक नाते हे उपयुक्त आहे किंवा नाही या "व्यापारी' निकषावर जपले किंवा तोडले जाते. कुटुंब ही संस्कार करणारी संस्था न राहता, केवळ व्यावहारिक सोय करणारी व्यवस्था झाली की, ज्यांचा उपयोग नाही, ज्यांच्यापासून मदत नाही, अशी माणसे अनावश्यक, अवांछनीय वाटू लागतात. सत्य-असत्य, चांगले-वाईट, शुभ-अशुभ, नीती-अनिती, हितकर-अहितकारक काय? हे चिरंतन जीवनमूल्यांच्या नव्हे तर स्वतःच्या स्वार्थ आणि अहंभावाच्या निकषावर ठरवले जाते. भारतीय संस्कृतीत कुटुंब जीवन निकोप, शांततामय, सहकार्याचे, हार्दिक राहण्यासाठी सर्व सदस्यांनी काही बंधने स्वेच्छेने पाळून, स्पर्धा, मत्सर, हेवेदावे, वैर, द्वेष यापासून दूर राहण्याची शिकवण दिली जात असे. व्यक्तिगत संकुचित इच्छा, महत्वाकांक्षा, लोभ, मोह, स्वार्थ, नियंत्रणात ठेवणे आणि वर्तनातील संयम यामुळे कुटुंब सुखी आणि सुरक्षित रहाते हा संस्कार संस्कृतीतच होता.दुसऱ्याच्या हिताला अपाय होणार नाही अशा रितीने स्वतःच्या स्वातंत्र्य, सत्ता, संपत्ती, स्थान, मान, पद, बळ यांचा वापर नीती आणि न्याय यांचे पालन करून, जगणे, वागणे, बोलणे, करणे हे भारतीय कुटुंब व्यवस्थेचे सूत्र होते. सध्या कुटुंबसंस्था, नातीगोती संकटात येत आहेत, कारण गती-प्रगतीच्या काळात, नाती-जपण्या-जोपासण्यासाठी लागणारी स्वस्थता, शांतता, फुरसत शोधणे लोक विसरलेत. कोणाचा कोणाला मेळ नाही. पर्वा नाही. विश्वास नाही. प्रेम नाही. आपुलकी नाही. स्वच्छहीपणा, लहरीपणा, स्वैराचार म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य मानले जाऊ लागल्याने कुटुंबाचा संदर्भ तुटला आहे. कोणाचे कोणावर नियंत्रण नाही. एक उन्मत्त उन्माद सर्वत्र भरला आहे. आता कुणाला साधे जीवन जगायचे नाही. प्रत्येकाला काय वाटेल ते करून श्रीमंत व्हायचे आहे. दारिद्रयाशी, गरीबीशी जुळवून घेऊन आहे त्यात समाधान मानायला कुणी तयार नाही. यातून घराबाहेर गुन्हेगारी वृत्ती वाढते तर घरात शोषण, पिळवणूक, अन्याय, अत्याचार वाढतात. बायको-मुले नातेवाईक कशाचे तरी साधन म्हणून उपयोगी असतील तर त्यांचे महत्त्व वाटते. पूर्वीही माणसे पोटार्थी असत पण आता ती सुस्वार्थी झाली आहेत. हे सुख त्यांच्या मनातले नाही. बाह्यसुखसाधना आहे. इंग्रजीत मजा (झश्रशर्रीीीश) आणि सुख (करिळिपशीी) यात फरक करतात. आजकाल माणसे इंद्रिय-विषय सुखांशी निगडीत तात्कालिक मजेच्या मागे आहेत. दीर्घकाळ मनाला शांती, समाधान, तृप्ती देणाऱ्या "सुखा'ला ते पारखे झाले आहेत. आधुनिक मनुष्य स्वतःच्या घरी, स्वतःलाच न ओळखणारा "पाहुणा-परका' बनत चालला आहे, तो नातेसंबंध काय आणि कसे ओळखणार?सुखसाधनांच्या विपुलतेत सुखाचा दुष्काळ (र्झेींशीींू ळप ींहश श्रिशपींू) पडल्यामुळे माणसांच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याचे सामर्थ्य कुटुंब-नातेवाईक-परिवारात आहे. पण त्याऐवजी ही पोकळी भरून काढण्यासाठी तो क्लब, पार्ट्या, मद्यपान, धुम्रपान, अंमली पदार्थ, वेश्यागमन, टी. व्ही., चित्रपट, झोपेच्या गोळ्या अशा पळवाटा शोधतो आणि गर्दीत असूनही एकाकी रहातो. त्याचे एकाकीपण "आपल्या' अशा त्याच्या माणसातच संपू शकते हे त्याला कळत नाही. कारण "आपल्या'कडे तो परक्याप्रमाणे पहात असल्याने त्याला "आपले' हे "आपले' वाटत नाहीत म्हणून "आधार' वाटत नाही. वेगवान वाहनांनी मैलांचे अंतर कमी होऊन जग जवळ येत आहे पण माणसांच्या अंतरातले अंतर वाढून माणसे दूर जात आहेत. जग "ग्लोबल व्हिलेज' होत आहे पण "लोकल' रिलेशनशिपला या ग्लोबलायझेशनमध्ये स्थान नाही. नात्यांमधील भावना, अनुभव प्रचिती कायम रहाण्यासाठी नातेवाईकांनी सामायिक सामूहिक उत्सव, सुख-दुःखाच्या प्रसंगात उत्साहाने, आनंदाने, सहभावनेने एकमेकांसोबत काही अनुभव "शेअर' करणे आवश्यक असते. आपण सगळे एक आहोत आपण एकमेकांचे, एकमेकांसाठी, एकत्र आहोत ही भावना निर्माण करणारे कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक सण-समारंभ-उत्सव-सोहळे भारतीय संस्कृतीने "संधी' देण्यासाठीच निर्माण केले आहेत. लग्न, मुंज, बारसे, मृत्यूनंतरचे दिवस, श्राद्ध, डोहाळजेवणे, मंगलागौर, दिवाळी, दसरा, संक्रात, जत्रा, कुलदैवताची पूजा, गावजत्रा, वारी, रथ, पालखी, सप्ताह, भंडारे, नवरात्र, गणेशोत्सव, किर्तन, दशावतारी मेळे असे असंख्य प्रसंग म्हणजे केवळ सामाजिक, सांस्कृतिक वारसा नाही, तर कुटुंबसंस्था आणि नातेवाईक-इष्टमित्रपरिवार व्यवस्था स्नेहाच्या-सहकार्याच्या-स्नेहभावनेच्या-सहभावनेच्या पायावर उभे करणारे आधारस्तंभ आहेत हे जर आपण लक्षात घेऊ तर आपण जे गमावतो आहोत ते मिळवण्यासाठी आपल्याला किती प्रकारच्या संधी वर्षातून किती वेळा मिळतात हे लक्षात येईल. माणसे अशा प्रसंगी शरीराने हजर होतात पण मनाने उपस्थित होत नाहीत परिणामी माणसे जमतात पण नातेवाईक गोळा होत नाहीत, दृष्टीभेट होते पण मनोमिलन होत नाही. भारतीय संस्कृती आणि कुटुंब संस्था यातच नातेसंबंधांचे व्यवस्थापन शास्त्र अंतर्भूत आहे. नातेसंबंधांचे व्यवस्थापन म्हणजे प्रत्यक्षात आपल्याच मनाचे व्यवस्थापन आहे. नाते हा व्यवहार नाही, ती भावना आहे. जर भावना आहे, तर ती मनात आहे. म्हणून नातेसंबंध हा, आपल्या मनाचा, दुसऱ्याच्या मनाशी असलेला संबंध आहे. नाते संबंधांवर दुष्परिणाम करण्यात टी. व्ही. वरील मालिकांचा मोठा वाटा आहे. या मालिका पूर्वग्रह आणि संशय, अविश्वास वाढवितात. अपरिपक्व कमकुवत स्त्रिया त्यामुळे नाते संबंध बिघडवतात. दुःखी, एकाकी होतात, "मी-माझे-मला' या ऐवजी "आपण-आपले-आम्हाला' ही दृष्टी स्वीकारल्याखेरीज नाती निर्माण वृद्धिगत होऊ शकत नाहीत. नात्यातल्या अलिखित आचार संहितेचे आणि निःशब्द नितीचे पालन उभय पक्षांकडून व्हावे लागते. ते कृत्रिमपणे नव्हे सवईने होण्यासाठी ते जीवनदृष्टी-जीवनमूल्य-जीवनसरणीचा एक भाग असावे लागते. नाते सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. आत्मीयतेच्या काठीच्या आधारे तोल सांभाळून ती करायची असते. "ठशश्ररींळेपीहळि ळी सर्ळींळपस ोीश ींहरप हश वशीर्शीींशी' हे सूत्र विसरायचे नसते. एकमेकांची सुखदुःखे वाटून घेण्याची भूमिका लागते. आज "प्रायव्हसी'च्या नावाखाली परकेपणा दाखवला जातो, नाते जपायचे तर थोडी झीज, तोशीस, व्यत्यय, मर्यादित आक्रमण सोसण्याची तयारी लागते. "स्वतः' पलीकडे जाऊन, दुसऱ्याचा आणि "दुसऱ्याच्या' भूमिकेतून स्वतःचा विचार करून चूक-बरोबर ठरवून प्रतिक्रिया देण्याची सवय स्वतःला लावावी लागते. सल्ला हल्ला वाटूनये अशा प्रकारे द्यावा लागतो. नातेवाईक जन्माने मिळतात आणि मित्र निवडता येतात हे खरे असले तरी नातेवाईकांना निवडलेले मित्र म्हणून वागवले तर त्यांच्याशी मैत्रीचे नाते जमू शकते व ते अधिक उत्कट होऊ शकते.नात्यांच्या व्यवस्थापनासाठी क्षमाशीलतेची गरज असते. "पझेसीव्हनेस' ठेवून चालत नाही. मत्सराला थारा नसतो. कुणी किती केले, दिले, घेतले, भोगले अशी दिल्या-घेतल्याची व्यावहारिक नोंद ठेवायची नसते. ज्याप्रमाणे आरशात आपल्याला आपलेच प्रतिबिंब दिसते तसेच आपल्या नातेवाईकांच्या मध्येही आपले प्रतिबिंबच आढळणार हे जर लक्षात ठेवलेत तर अनेक मुद्द्यांवर तुम्ही थोडे वेगळे वागाल. नाते संबंध आपोआप रहात-वाढत नाहीत, त्यासाठी चित्रात रंग भरावे, वाद्यात सूर आणावे, तसे नातेसंबंध रंगण्यासाठीही काही करावे."नातेसंबंधांचे व्यवस्थापन' या विषयाच्या संदर्भात तुम्ही आवर्जुन वाचावीत अशी ही काही पुस्तके 1) स्त्री विरुद्ध पुरुष, लेखक, शिवराज गोर्ले, राजहंस प्रकाशन. 225 रु. 2) तो आणि ती. अनुवाद डॉ. रमा मराठे, मेहता पब्लिशिंग हाऊस. 250 रु. 3) नवरा बायको का भांडतात? लेखक : संजय नाईक, इंद्रायणी साहित्य. 60 रु. 4) बाप लेक का भांडतात? लेखक : संजय नाईक. इंद्रायणी साहित्य. 50 रु. 5) सासू सुना का भांडतात? लेखक : संजय नाईक, इंद्रायणी साहित्य. 60 रु. 6) विवाह संस्कार, लेखक : बाळ सामंत, परचुरे प्रकाशन मंदिर. 125 रु. 7) स्पाउस, लेखिका : शोभा डे, पेंग्वीन प्रकाशन. रु.150 8) वर्तन-परिवर्तन लेखिका : अंजली पेंडसे, अनुश्री प्रकाशन. 200 रु. 9) मी मानवी हितसंबंध जोपासणारच, लेखक: उमेश कणकवलीकर, सक्सेस सपोर्ट सिस्टीम. 150 रु. 10) अपने परिवार को खुश रखने के सरल तरी के लेखक:प्रमोद बत्रा, थिंक आय.एन.सी. 256 रु. 11)सुसंवाद सहकाऱ्यांशी, अनुवाद : अविनाश भोमे, रोहन प्रकाशन. 80 रु. 12) लोकआदर प्राप्त करण्याच्या व्यवहार कुशल किमया, लेखक: वनराज मालवी, सेल्फ डेव्हलपमेंट पब्लिकेशन 65 रु. 13) चक्रम माणसाशी कसे वागावे?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment